आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कळंब, वाशी तालुक्यासह उस्मानाबाद तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. कळंब तालुक्यातील मोहा मंडळात अितवृष्टी झाली. प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने मस्सा, बावी, मांडवा शिवारात अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले. जिल्ह्यात यावर्षी उशिराने पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आठ दिवसांपासून वेगवेगळ्या भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी मोहा मंडळात ७६.३ मिलीमीटर (अतिवृष्टी) पावसाची नोंद झाली. या पावसाने परिसरातील गावांमध्ये प्रचंड पाणी झाले. मस्सा शिवारात गणेश तावस्कर, राजाहरिश्चंद्र तावस्कर, महेश घाडगे, अशोक थोरात, राजेश वरपे आदींच्या शेतातील माती वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
बावी तसेच मांडवा शिवारातही मोठा पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला होता. काही भागात पेरणी झालेल्या शेतातील मातीही वाहून गेली आहे.उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, जागजी,तेर परिसरातही पावसाने शेतकऱ्यांना दिलासा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९२.६ मिलिमिटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत १५.६ मिलीमिटर पाऊस झाला आहे.काही भागात समाधानकारक पाऊस सुरू असला तरी अद्याप अनेक भागाला पावसाची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.