आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:परंड्यातील कत्तलखान्यावरील सर्वात मोठ्या कारवाईत 23 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अवैधरीत्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्रीसाठी वाहनांमधून नेताना उस्मानाबाद स्थानिक गुन्हा शाखा व परंडा पोलिसांनी ५०० किलो मांस, ३ संकरीत गोवंशीय जनावरे व चार वाहने असा एकुण २३ लाख ४० हजाराचा ऐवज जप्त केला.ही कारवाई शनिवारी (दि.२) रात्री ९ च्या सुमारास जामगाव मार्गावरील कत्तलखान्यात करण्यात आली. याप्रकणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने कारवाई केली. जामगाव मार्गावरील कत्तलखान्यात अवैधरित्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्रीसाठी वाहनात भरत असताना स्थानिक पोलिस पथकाने धाड टाकून ५०० किलो मांस व ३ गोंवशीय जनावरे, मोठा टेम्पो, लहान टेम्पो, दोन पिकअप, एक पांढरी विना नंबरची दुचाकी असा एकुण २३ लाख ४० हजाराचा ऐवज जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय निलंगेकर, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हाळ, योगेश कोळी, अमोल चव्हाण, भांगे, परंडा पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, एपीआय राजकुमार ससाने, विक्रांत हिंगे, योगेश यादव, शबाना मुल्ला आदी २३ जण पथकात होते. खबरदारी म्हणून आरसीपी पथक, होमगार्ड तैनात केले होते. एपीआय संदीप ओव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फाजील सौदागर, शोयब शेख व अन्य दोघांच्या विरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मांसाची विल्हेवाट लावली तर जिवंत ३ गाई भूम तालुक्यातील हाडोंग्री येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या. आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...