आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यायामुळे स्फोट:मविआ सरकार जनतेच्या मनातील सरकार नव्हते : माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड

उमरगा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार जनतेच्या मनातील सरकार नव्हतेच याबाबत मी त्यावेळीही नाराजी व्यक्त केली होती. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे यात अपशकुन होऊ नये म्हणून मी शांत राहिलो. परंतु चांगले मुख्यमंत्री असूनही त्यांचे आजारपण व आमदारांवर होणारा अन्याय यामुळे हा स्फोट झाला असल्याचे माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड यांनी सांगितले.

उमरगा-लोहारा तालुका शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व लोकप्रतिनिधी यांची शुक्रवारी (०९) शहरातील श्री मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली त्यावेळी माजी खासदार प्रा गायकवाड बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, बाजार समिती माजी सभापती जितेंद्र शिंदे, सभापती एम ए सुलतान आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. गायकवाड म्हणाले, सर्वसामान्य नागरिक मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी जनता लोकप्रतिनिधीना निवडून देतात. गणपतीच्या विसर्जनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आ. ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांनीही विचार मांडले.

बातम्या आणखी आहेत...