आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद क्षणभंगुर:न्यायालयाने चुकीच्या निर्णयाचे पितळ‎ उघडे पाडले, तरीही खोके सरकार कायम‎;  'मविआ'च्या नेत्यांचे टीकास्त्र

धाराशिव‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायाल्याने तत्कालीन परिस्थितीत‎ शासन-प्रशासनाने सोयीनुसार नियम करत‎ चुकीच्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन केले.‎ या सर्व बाबी न्यायालयाने समोर आणून‎ दिल्या आहेत. त्यानंतरही खोके सरकार‎ कायम असल्याचे मत महाविकास‎ आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केले.‎

याबाबत आमदार कैलास पाटील यांनी‎ जनतेच्या न्यायालयावरच आमचा विश्वास‎ आहे. सरकारने राजीनामा देऊन मैदानात‎ यावे, असे आवाहन केले आहे. सर्वोच्च‎ न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर‎ झाला. त्यामध्ये आमच्या पक्षाला दिलासा‎ मिळाला आहे. तसाच जनतेच्या न्यायालयात‎ आम्हालाच न्याय मिळणार असल्याचा‎ विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त‎ केला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या‎ आजच्या निर्णयाने शिंदे सरकारला काही‎ दिवस पदावर राहता येणार असले तरी हा‎ आनंद क्षणभंगुर आहे. मुळ पक्षाला म्हणजे‎ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या‎ प्रतोदला अधिकृत मान्यता न्यायालयाने‎ दिल्याचे स्पष्ट केले. ‘प्रतोद चुकीचा, त्यांनी‎ काढलेला व्हीप चुकीचा, माजी मुख्यमंत्री‎ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर‎ ते परत मुख्यमंत्री बनले असते’.

म्हणजे या‎ वाक्यातून असं जाणवत की या आधीच्या‎ ज्या काही कारवाया झाल्या त्या नैतिकतेला‎ धरून नाहीत. सरकारकडे नैतिकता शिल्लक‎ असल्यास सरकारने राजीनामा देऊन‎ पायउतार व्हावे. अन्यथा जनता येणाऱ्या‎ निवडणुकांमध्ये स्वतःच न्याय करेल, असे‎ मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश‎ बिराजदार यांनी व्यक्त केले.‎