आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:बेंबळीच्या दोन पोलिस‎ अधिकाऱ्यांना पदक‎

उस्मानाबाद‎ / धनाजी खापरे‎ कुलदिप सोनटक्के8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेंबळी येथील एकाच‎ वर्गात शिकून पोलिस उपनिरीक्षक‎ म्हणून रुजू झालेला दोन वर्गमित्रांना‎ भारत सरकारचे आंतरिक सुरक्षा‎ पदक झाहीर झाले आहे. यामुळे‎ गावातून त्यांचे कौतुक करण्यात येत‎ आहे.‎ बेंबळीचे सुपुत्र सहाय्यक पोलिस‎ निरिक्षक धनाजी खापरे पाटील व‎ कुलदीप सोनटक्के हे दोन वर्गमित्र‎ गडचिरोली येथे पोलिस उपनिरीक्षक‎ म्हणून कार्यरत होते. यात धनाजी‎ खापरे पाटील यांनी २०१७ ते २०२०‎ या काळात तर कुलदीप सोनटक्के‎ यांनी २०१९ ते २०२२ या काळात‎ गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य‎ बजावले होते. त्यांच्या कार्यकाळात‎ दोघांनीही गडचिरोली येथे‎ नक्षलवादयांच्या विरोधात‎ प्रभावीपणे प्रतिबंधक‎ कारवाही केली.

त्याबद्दल‎ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला‎ दोघांनाही भारत सरकारचे आंतरिक‎ सुरक्षा पदक जाहीर झाले. गेल्याच‎ वर्षी खापरे पाटील यांना गडचिरोलीत‎ प्रभावी कामगिरी केल्याबद्दल‎ महासंचालक कार्यालयाचे पदक व‎ विशेष सेवा पदक देऊन सन्मानित‎ करण्यात आले आहे. सोनटक्के‎ यांना विशेष सेवा पदक देऊन‎ गौरविण्यात आले आहे. त्यात या‎ दोन्ही वर्गमित्रांना एकाच वेळी भारत‎ सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक‎ जाहीर झाले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...