आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मंजुरी मिळाली:उस्मानाबाद येथील मेडिकल काॅलेजला मिळाली मंजुरी

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर मंजुरी मिळाल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेगाने (एनएमसी) गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे मराठवाड्यात आणखी एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भर पडली. १०० प्रवेश क्षमतेचे उस्मानाबादचे हे महाविद्यालय या वर्षीच सुरू होणार आहे.

महायुतीच्या काळात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मात्र, पुढे या प्रक्रियेला गती आली नव्हती. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भात घोषणा केली. शासनाने शासन निर्णय निर्गमित केला. त्यानंतर ४ फेब्रुवारीला एनएमसीने पाहणी करून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा अहवाल तयार केला. मात्र, सुविधा नसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करता येणार नाही, असा स्पष्ट अहवाल देण्यात आल्यामुळे महाविद्यालयाची शाश्वती उरली नव्हती. मात्र, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि एनएमसीची टीम फेरतपासणीसाठी आली.

बातम्या आणखी आहेत...