आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित होऊन तेथे प्रत्यक्षात महाविद्यालय इमारतीचे बांधकाम सुरु होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची समिती ३० एप्रिलपर्यंत भेट देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागात सामंजस्य करा, प्राध्यापक, सपोर्ट स्टाफच्या भरतीबाबत चर्चा झाली. महाविद्यालय सुरु करायच्या इमारतीत व्याख्यान कक्ष, वर्ग खोल्या, विविध प्रयोगशाळा उभारणीसाठी जागा तयार करण,उपकरणे खरेदीबाबतही चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागात सामंजस्य करार अपेक्षित आहे. प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे प्रलंबित आहे, या प्रक्रियेस गती देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. पाहणी दरम्यान इमारतीत अस्वच्छता व इतर गैरसोयीच्या बाबी निदर्शनास आल्या.
बैठकीत जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत साफसफाईबाबात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे व स्वछता निरीक्षक सुनिल कांबळे यांना जबाबदारी दिली. स्वच्छतेचे कामही सुरू झाले असून ७ दिवसात पूर्ण इमारत व परिसर स्वछ करून देण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले. पदभरती बाबतची प्रक्रिया वेगाने करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अधिष्ठाता डॉ. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, डॉ. सचिन देशमुख, डॉ. मुल्ला, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता चव्हाण उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.