आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील तुगाव येथे बुधवारी नाबार्ड पुरस्कृत व बायफ संचालित उपक्रम’ दूध उत्पादन वाढीसाठी लिंग निश्चित वीर्य ‘सॉर्टेड सिमेन’ चा वापर करून तयार केलेल्या संकरीत कालवडींचा मेळावा घेण्यात आला. पारंपरिक वीर्य कांड्या वापरून कृत्रिम रेतन केल्यानंतर खोंड व कालवडीचा जन्मदर हा ५० टक्के अाहे. यामुळे पशुपालकांचे ५० टक्के नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व कालवडींचा जन्मदर ५० टक्के वरून ९० टक्के करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत एप्रिल २०१८ पासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बायफ संस्थेच्या माध्यमातून लिंग निश्चित वीर्य ९० टक्के कालवडी होणाऱ्या वीर्य कांड्या वापरून कृत्रिम रेतन करण्यास सुरुवात केली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उस्मानाबाद डॉ. सुनील पसरटे यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड उस्मानाबाद चैतन्य गोखले यांनी नाबार्ड मार्फत असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. सॉर्टेड सिमेन वापरून परिसरामध्ये कालवडींची संख्या वाढवण्यास हातभार लावल्याने कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आबासाहेब मरवाडकर, तानाजी लोंढे व संताजी मिसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग उस्मानाबाद डॉ. मुकुंद तावरे, डॉ. सूर्यकांत नागरगोजे, डॉ. शबिरोद्दिन शेख, महेश नरोडे, डॉ. कृष्णा जाधव, अतुल मुळे, तुगावचे किशोर शेंडगे, मोहन लोमटे आदी ग्रामस्थ व पशुपालक याप्रसंगी उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायात काळजी जिल्हा पशुसंवर्धन सहायक उपआयुक्त, उस्मानाबाद डॉ. एस. जी. साळुंखे यांनी दुग्ध व्यवसाय करताना पशुपालकांनी कोणती काळजी घ्यावी, या बद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात दुग्ध व्यवसायात विशेष प्रगती केलेल्या शेतकऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.