आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:भूममध्ये कुलवंत वाणी समाजाचा मेळावा

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कुलवंत वाणी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा व विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्यावतीने दोन दिवसीय सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्राशी संबंधित, समाजातील सर्व घटकांकरिता विविध उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये दि.३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा झाला.

यावेळी समाज वधू वर परिचय पुस्तिका-सन २०२२-२३ प्रकाशन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा सत्कार करण्यात आला व रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने समाजातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा,समाजातील विविध ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्तांचा सन्मान,आरोग्य तपासणी शिबीर,मार्गदर्शनपर व्याख्यान व नियोजित सामुदायिक विवाह सोहळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध गावातील सर्व समन्वयक, येथील मराठवाडा,नगर व पुणे विभागातील सर्व कुलवंत वाणी समाजबांधव व भगिनी सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...