आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:भूममध्ये मराठी साहित्य संघाचे संमेलन उत्साहात

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संघ व शंकरराव पाटील महाविद्यालय भूमच्या विद्यमाने उस्मानाबाद जिल्हा मराठी साहित्य संघाचे पहिले संमेलन भूम येथे पार पडले.

मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथे आयोजित केलेल्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक हणमंत पडवळ उपस्थित होते . तर उद्घाटक म्हणून उस्मानाबाद बीड लातूर नांदेड जिल्ह्याचे विभागीय उपसंचालक माहिती अधिकारी यशवंत भंडारे तर टीव्ही सिरीयलवरील अभिनेते रवींद्र ढगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिवाय ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. कुचेकर पाटील पुणे, अनुपमा भंडारी, गट शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिका लातूर, कवयित्री सरिता कलढोणे, परशुराम नागरगोजे अहमदनगर, सुरेश मंत्री अंबाजोगाई, सुरेश तळेकर, संतराम जोगदंड गेवराई, भानुदास धोत्रे परभणी, ओमप्रकाश कांबिलकर औरंगाबाद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. बी. चंदनशिव, प्राचार्य शाहू बोराडे सह असंख्य जेष्ठ साहित्यिक ९ जिल्ह्यातून उपस्थित होते. या साहित्य संमेलनमध्ये ज्येष्ठ साहित्यिक जी. एस. कुचेकर पाटील यांच्या दोन कथासंग्रहाचे, परशुराम नागरगोजे अहमदनगर यांच्या कथा संग्रहाचे व कवयित्री सरिता कलढोणे यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या संमेलनामधे कथा, कविता, गझल, लावणी या सर्व साहित्याचे मूल्यांकन उपस्थित परीक्षकांनी केले. यातून आलेल्या एकूण सहा साहित्यिकांना सन्मानचिन्ह देण्यात आली. यामध्येजी. डी. गरड, प्रा. अरुण गाढवे, मधुकर बाबुराव हुजरे, शुभांगी मस्के, अर्चना अंभोरे उस्मानाबाद,श्यामभुवन नवले यांचा समावेश आहे.

कला केंद्रातील व ऊसतोड मजूर यांच्या लहान मुलांचे संगोपन करणाऱ्या खुशी ग्राम फाउंडेशन लातूरचे मधुकर सोनवणे, ज्येष्ठांसाठी कल्याणकारी कार्य करणारे ह.भ.प. गहिनीनाथ लोखंडे महाराज, आदिवासी पारधी समाजातील कीर्तनकार हभप अरुण बाजीराव काळे महाराज यांनाही सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...