आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आता अद्ययावत वैद्यकीय सकुल उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात गुरूवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.येथील वैद्यकीय शिक्षण केवळ एमबीबीएस पुरतेच मर्यादित न राहता पदव्युत्तर आणि अतिविशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम (सुपर स्पेशालिटी), फिजिओथेरपी, डेंटल, नर्सिंग या सर्व शाखेचे अभ्यासक्रम येथे सुरू करून एक परिपूर्ण अद्यावत वैद्यकीय संकुल विकसित करण्याची अभिनव संकल्पना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडली होती. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत बैठक बोलविण्याची विनंती केली होती.
या विनंतीनुसार त्यांनी गुरूवारी दुपारी ३ वाजता येथे वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक बोलावली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व त्या जवळील जलसंपदा विभागाची एकूण ५० एकर जागा या प्रस्तावित संकुलासाठी उपलब्ध करणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र शासकीय तंत्रनिकेतनच्या उपलब्ध रिकाम्या जागेत स्थलांतरित करणे, १००० खाटांचे सुसज्ज रुग्णालय व २५० पर्यंतचा विद्यार्थी प्रवेश लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाची रचना करणे, महाविद्यालयाची इमारत व परिसराचे नियोजन करताना सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित बृहत आराखडा तयार करण्यास्तव प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे या अनुषंगाने चर्चा होणे अपेक्षित आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.