आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:अधिक्षकांच्या उपस्थितीत‎ तेरखेडा पारधी वस्तीवर बैठक‎

येरमाळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे‎ पारधी समाज चालला तर‎ त्यांची प्रगती कोणीही रोखू‎ शकत नाही आणि राज्यात‎ इतिहास घडल्याशिवाय‎ राहणार नाही असे मत पोलिस‎ अधिक्षक अतुल कुलकर्णी‎ यांनी तेरखेडा येथिल लक्ष्मी‎ पारधि वस्तीवरील आयोजीत‎ बैठकीमध्ये व्यक्त केले.‎ लक्ष्मी पारधी वस्तीवर‎ जिल्हा पोलिस प्रशासनाच्या‎ वतीने विविध योजनेसह‎ विविध योजनेसाठी लागणारी‎ कागदपत्रे व माहितीसाठी‎ पोलिस अधिक्षक अतुल‎ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत‎ मार्गदर्शन शिबीराचे आयोजन‎ करण्यात आले होते.

पारधी‎ समाजाच्या व्यक्तींनीही छोटे‎ मोठे उद्योग सुरु करुन धंदा,‎ व्यवसाय करावा यासाठी‎ पोलिस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांनी पुढाकार घेत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रारंभ केला त्यांच्याकडून‎ माहिती घेत उपस्थितांना‎ विविध शासकीय योजनांची‎ माहिती देत वस्तीतंर्गत‎ रस्ते,घरकुल,जात‎ प्रमाणपत्र,आधार,लहान‎ मुलांच्या शिक्षणासाठी‎ आश्रम,अंपगाच्या‎ योजना,महिलांसाठी छोटे-छोटे‎ उद्योग व्यवसायासाठी‎ मार्गदर्शन शिबीर,विविध‎ कोर्सेस आदिंची माहीती दिली.

‎ कागदपत्रे काढण्यासाठी कॅम्प‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आयोजित करुन पुढील दोन ते‎ तीन महिन्यापर्यं लोकांना‎ शासकीय योजनेचा लाभ‎ मिळवून देणार असल्याचे‎ सांगितले.यावेळी कळंब‎ उपविभागीय पोलिस अधिकारी‎ एम. रमेश,सपोनि दिनकर‎ गोरे,तलाठी,ग्रामसेवक ,महा-ई‎ सेवा केंद्राचे प्रतीनिधि,‎ अधिकारी,रेशन दुकानदार‎ यांच्यासह पोलिस अधिकारी व‎ अंमलदार,पारधी समाजाचे‎ लोक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...