आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती नियोजन:अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बैठक

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी होणारी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे, अशी घोषणा जय हनुमान ग्रुपचे प्रमुख सुरेश कांबळे यांनी बैठकीत केली.

भूम तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी होणार असून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी यश मंगल कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी सुरेश कांबळे यांनी राज्यभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते, परंतु दोन वर्ष कोरोनामुळे जयंती साजरी करता आली नाही. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्यामुळे तालुक्यात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याची घोषणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना जय हनुमान ग्रुप अध्यक्ष सुरेश कांबळे म्हणाले की, ही जयंती सर्वांना समाविष्ट करून लोकसहभागातून करायची आहे. जयंतीत समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी ओवी गायन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

येत्या काही दिवसात कार्यक्रमाचे स्वरूप, तारीख कळवण्यात येईल, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने सांगण्यात आले. नियोजनपर बैठकीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या बैठकीला धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे, शिक्षण महर्षी आर. डी. सूळ, शिक्षक, युवक, समाजातील ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...