आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग संबंधित सूचना; तक्रारीसाठी आज बैठक

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्ग तसेच जिल्ह्यातील प्रस्तावित सुरत-चेन्नईसह अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या विषयांबाबत सोमवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सूचना अथवा समस्या मांडायच्या असल्यास लेखी स्वरूपात बैठकीच्या ठिकाणी आणाव्यात, असे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे सरकारने मागील ३ वर्षापासून प्रलंबित ठेवलेल्या सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत शिंदे-फडणवीस सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. पुढील कामाचे कालबद्ध नियोजन करण्यासाठी रेल्वे, भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील परंडा व तुळजापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई मार्गाच्या भूसंपादनासंबंधित देखील आढावा घेण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सोलापूर - नळदुर्ग- उमरगा, सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद - औरंगाबाद, तुळजापूर - औसा - नागपूर, नळदुर्ग - अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्ग संबंधित नागरिकांना काही समस्या अथवा सूचना द्यावयाच्या असतील तर लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...