आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर जवळील होटगी येथील विमानसेवा चालू करण्याच्या नावाखाली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून कारखाना मोडित काढण्याचा डाव काहींनी रचला असून तो यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा कारखाना बचाव समितीच्या वतीने देण्यात आला.
या कारखान्यावर हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असताना विमान सेवेच्या नावाखाली कारखाना बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. बोरामणी येथे विमान सेवेसाठी जागा असताना ही उठाठेव कशासाठी, असा सवाल कारखाना बचाव समितीने उपस्थित केला आहे. येथे बुधवारी (दि. ३०) सकाळी कारखाना बचाव समितीच्या वतीने कारखान्याच्या समर्थनार्थ अण्णा चौकातून घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.
रॅलीचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी अॅड. दीपक आलुरे, सरपंच रामचंद्र आलुरे, अरविंद घोडके यांनी सभेला संबोधित केले. याप्रसंगी काशीनाथ शेटे, मल्लिनाथ मुळे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल मुळे, पवन आलुरे, मल्लिनाथ व्हड्रे, राजेश देवसिंगकर, कल्याणी मुळे, प्रकाश गोवे, माजी सरपंच दशरथ गायकवाड, शहापूरचे सरपंच उमेश गोरे, गणेश मोरे, दयानंद चव्हाण, नागेश शेटे, सोपान घुगे आदी उपस्थित होते. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.