आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे स्वागत:ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

मोहा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर हे होते तर मोहा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप झोरी, प्राचार्य संजय जगताप तसेच उच्च माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षक प्रा.श्रीमती सुरेखा तांबारे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजनाने झाली. याप्रसंगी शोएब सय्यद या विद्यार्थ्याने स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रीमती अरुणा देशमुख यांनी केले.

अकरावीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले तसेच दहावी मार्च २०२२ परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी मयुरी नागटिळक, प्राची पाटील, प्रज्ञा कोकाटे, प्रीती सुडके, पुनम मडके, प्रगती कसबे व दिव्या शेळके यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अनुजा लोमटे व वैष्णवी माळी या बारावीच्या विद्यार्थीनींनी स्वागतपर शुभेच्छा दिल्या तर प्रीती पवार व नाजिया सय्यद या विद्यार्थीनींनी मनोगतातून उत्तर दिले. प्राचार्य संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...