आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाटील प्रशाला येथे गुणवंत दिव्यांगांचा सत्कार ; उस्मानाबादेत कार्यक्रमाचे आयोजन व समुपदेशन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाई उद्धवराव पाटील प्रशाला, उस्मानाबाद येथे जागतिक दिव्यांग सप्ताहनिमित्त गुणवंत दिव्यांगाचा सत्कार बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथील वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. अंजली सूर्यवंशी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारायण मुदगलवाड , डॉ. उमेश नरवडे , प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.ए. नलावडे, विषय तज्ञ प्रकाश लांडगे व थोरडसरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश लांडगे यांनी करून या दिव्यांग दिन साजरा करण्यात मागील कारण, कार्यक्रमाच्या हेतू व उद्देश सांगून जनजागृती करणे व पालकांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. डॉ. श्री. उमेश नरवडे यांनी आपल्या भाषणातून समावेशित शिक्षणाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व प्रकारे सहकार्य करावे तर डॉ. श्री. एन.के. मुदलवाड यांनी एडिसन यांचे जीवन कार्य व दिव्यांग असूनही विजेचा शोध लावला असे सांगितले. हे गोष्टी रूपातून सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस.ए. नलावडे यांनी मार्गदर्शन करताना प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्याच्या अंगी असलेले गुण व त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, सर्व शिक्षकांची मदत, सहकार्य व विशेष तज्ञाद्वारे, गटसाधन केंद्रातर्फे मिळत असलेल्या सर्व शासकीय योजना याबद्दल गट समन्वयक दैवशाला हाके व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चिलवंते यांचे कौतुक व धन्यवाद मानले. अध्यक्षीय समारोपातून डॉ. अंजली सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी दिव्यांग विद्यार्थिंनीची गोष्ट सांगून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढीचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एल. माळी केले. तर आभार प्रदर्शन एच.व्ही. घेवारे यांनी मानले.

या गुणवंतांना मिळाला पुरस्कार, पालकांकडून कृतज्ञता व्यक्त सदर कार्यक्रमांमध्ये प्रशालेतील दिव्यांग गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक चि. श्रेयश अच्युत शेंडगे, कु. ज्ञानेश्वरी सांगळे, चि. आशपाक शेख, कु. निशा सर्जे, चि. ओम गोरे, कु. विश्वजीत धुमाळ, चि. देव हावळे, चि. अशोक देवरे व चि. रोहन कसपटे यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमांमध्ये कु. ज्ञानेश्वरी सांगळे हिने आपल्या मनोगतून शाळा, शिक्षक, विद्यार्थी व विशेष तज्ञ, विशेष शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन, सहकार्य याबाबत सांगितले. पालकांच्या मनोगतातून श्री व सौ. कसपटे यांनी आपल्या पाल्याविषयी अतिशय भावुक शब्दांत समाजाकडून मिळालेली वागणूक, शिबिरामधून मिळालेली प्रेरणा, तज्ञाचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...