आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:इयत्ता दहावी मधील गुणवंत; परंडा जि.प. कन्या प्रशालेचा याही वर्षी 100 टक्के निकाल

परंडा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा सलग सहाव्या वर्षी १०० टक्के निकाल लागला असुन इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थिनींचा शनिवार (दि.१८) गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेत कन्या प्रशालेतील साक्षी जाधव ९२.०० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर मयुरी गटकुळ ८७.८० द्विती क्रमांक, कल्यानी कुदळे ८६.८० टक्के गुण तृतीय क्रमांक मिळवला.

तिन्ही विद्यार्थिनींचा शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल परंडा व परिसरामध्ये कौतुक होत असुन सदरील गुणवंत विद्यार्थीनी कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश संपादन केले आहे.सदरील मुलींनी आपली परिस्थिती सामान्य असताना सुद्धा सर्व प्रकारच्या अडीअडचणी वर मात करीत उज्वल यश संपादित केले आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कालिदास झिने यांनी केले तर सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक दिनकर पवार, बबन गवळे, रावसाहेब खरसडे, नामदेव पखाले, अब्दुल हनुरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी आबासाहेब माळी, मीनाक्षी मुंढे, रेखा उसराटे, चंद्रकांत सुरवसे, गीतांजली जगताप व पालक उपस्थीत होते.सर्व उपस्थितांचे भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...