आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत; चिंचपूर येथे विद्यार्थ्यांचा गौरव

परंडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील विजयसिंह पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. इयता बारावी (कला) शाखेच्या सन २०२२ मध्ये घेतलेल्या बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

यावेळी प्रदीप पाटील शिवाजी कासारे, मुख्याध्यापक केसकर आदीच्या हस्ते शिवानी साळुंके, अश्विनी सुरवसे व किर्ती गोरे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पालक गोकुळ साळुंके गोरख गोरे व शिवाजी सुरवसे आदींचा गौरव करण्यात आला याप्रसंगी राहुल लांडे, सुजित हगारे, बापु चव्हाण, सानिका भिल्लारे,अनुष्का देवकर, सौरव गवसणी आदी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास आश्रुबा शिंदे,दत्ता मल्हारे बाळू मोरे ,हरिभाऊ बोडके, बालाजी शिंदे आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...