आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:श्रीकृष्ण विद्यालय व श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत; गुंजोटीत दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुंजोटी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्रीकृष्ण विद्यालय व श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शनिवार (दि. १८) संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये शाळेतून गौरी किसन पाटील व गणेश कांबळे यांनी ९५.६० टक्के घेत प्रथम क्रमांक मिळविला तर संचित देशमुख ९५.२० टक्के घेत द्वितीय क्रमांक मिळविला तर नम्रता साळुंके व समर्थ आळंदकर यांनी ९४.८० टक्के घेत तृतीय क्रमांक मिळविला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. दामोदर, प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा बिटच्या केंद्रप्रमुख शीला मुदगडे उपस्थित होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकरराव हिरवे, संचालक डॉ सागर पतंगे, संगय्या स्वामी, शिक्षक प्रतिनिधी बालाजी घुले, मुख्याध्यापक, शिवानंद बुदले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा भोसले, उपप्राचार्य जयदीप कुलकर्णी, उप मुख्य अधिकारी संजय कदम, पर्यवेक्षक अजय गायकवाड, प्रा. माधव माने, प्रा. रत्नाकर पतंगे, प्रा. अभयकुमार हिरास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक बुदले यांनी केले. केंद्रप्रमुख शीला मुदगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार सहशिक्षक सोमशंकर कुंभार यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...