आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उमरगा येथे सत्कार

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही गुणवत्ता वाढत असल्याने अनेक विद्यार्थी स्पर्धेत यश मिळवत आहेत. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तुंग झेप घेऊन राज्यात प्रथम येत आहेत. उमरग्याचा नवीन गुणवत्तेचा पॅटर्न निर्माण होत असल्याचे मत जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार बोलत होते. यावेळी युवानेते किरण गायकवाड, भाजपचे कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकणे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस धीरज बेळंबकर उपस्थित होते. यावेळी चौथी एमटीएस परीक्षेत राज्यात प्रथम पृथ्वीराज फुगटे, तिसऱ्या एमटीएसमध्ये आदर्श काळे राज्यात द्वितीय तर दुसरी एमटीएस परीक्षेत मुलींतून संचिता चुंगे हिने राज्यात प्रथम येत तालुक्याचे नाव संपूर्ण राज्यात उज्ज्वल केले. या गुणवंतांबरोबरच प्राची कुडकले, अर्णव तोडकर, यशराज गडदे, तेजस्विनी क्षीरसागर, प्रसाद तंगशेट्टी, तैनियात शेख, आन्वी भुसार, उमादेवी बुलबुले, आदित्य मुसांडे तर इयत्ता पाचवी स्कॉलरशिप होल्डर रुधिरा साळुंके, अथर्व क्षीरसागर, रोहन केदारे, श्रेयशी शिंदे, प्रियंका राम शिंदे, हिना मुल्ला, इमरान शेख, बेबी जैनबी लोहारे या गुणवंताचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात तालुक्याचे नाव विविध स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल करावे. स्पर्धा परीक्षा व त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी व सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. यावेळी संताजी चालुक्य, डॉ. बुटुकणे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबासाहेब जाधव, स्वप्नील पाटील, बशीर शेख, सुनिता राठोड, वनमाला वाले यांनी पुढाकार घेतला. उमरगा-लोहारा एमटीएसप्रमुख मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. अर्जुन भुसार यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...