आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:बालाजी पवार यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा,वैद्यकीय,सांस्कृतिक,क्षेत्रात करीत असलेल्या विशेष योगदानाबद्दल शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो.शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची विशेष नोंद घेऊन संस्थेच्या वतीने सन २०२२ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीबामणी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बालाजी पवार याना सोलापूर येथील डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रदान केला.

सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे,भगवंत इन्स्टिटयूड ऑफ टेक्नोलॉजी बार्शीचे प्राचार्य डॉ अनिल देशमाने,आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर संस्थापक तथा अध्यक्ष संजय पवार,सोलापूर जिल्हाध्यक्ष जब्बर शिकलगार,तुळजापूर तालुकाध्यक्ष इसाक पटेल यांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीबामणीचे मुख्याध्यापक दिलीप नन्नवरे,श्रीमंत लगस,राजेंद्र चव्हाण,दत्तात्रय भालेकर,संजीवन चौधरी,गुणवंत चव्हाण,राहुल गुरवे,तुकाराम वाडकर,डॉ महेश गुरव,अतुल माळी,नेताजी चव्हाण,सिद्धेश्वर कांबळे आदी उपस्थित होते.विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे सर,वडगावचे युवानेते अंकुश मोरे,गजेंद्र जाधव,सरपंच बळीराम कांबळे व इतरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...