आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बोगस लाभार्थींच्या शोधासाठी सूक्ष्म तपासणी मोहीम

कळंब7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या संसर्गामुळे लाभार्थी लोकांची तपासणी करण्यात आली नव्हती

राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या निराधार योजनेचा गैरफायदा लोक घेत आहेत. अशा व्यक्तींकडून होणारी शासनाची लुबाडणूक थांबवून पात्र लाभार्थींना लाभ देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून निराधार योजनेतील बोगस लाभार्थींची शोध घेण्यासाठी सुक्ष्म तपासणी शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, म्हणून १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावणबाळ सेवा योजना सुरू केली. त्यामुळे निराधारांना आधार मिळाला आहे. या योजनेतील अनुदान बँकांमार्फत वाटप करण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून यामध्ये बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी या निराधार योजनांपासून वंचित राहिले आहेत, अशा अनेक तक्रारी येत आहे. त्या अनुषंगाने कळंब तालुक्यातील निराधार योजनेतील लाभार्थींची सुक्ष्म तपासणी करण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत पतीचे निधन अथवा घटस्फोटाचा झाल्याचा पुरावा, २१ हजारांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, मुलाचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक आहे काय, कुटुंबाकडील शेती, तसेच शासकीय किंवा निमशासकीय नोकरीची पडताळणी करण्यात येणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेत ४० ते ६५ वर्षाखालील विधवा, दारिद्रय रेषेखालील पुरावा, कुटुंबाकडील शेती, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीची पडताळणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...