आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:उस्मानाबादेतील भंडारवाडीत मायलेकीने केली  विष प्राशन करून आत्महत्या

उस्मानाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भंडारवाडी येथे माय-लेकींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने भंडारवाडीत खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील अश्विनी सोमनाथ एडके (३५) व वैष्णवी सोमनाथ एडके (१५) या दोघींनी विष प्राशन केले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांची आत्महत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघींचेही मृतदेह ढोकी आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. याप्रकरणी ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दोघींच्या आत्महत्येनंतर गावात खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही.

बातम्या आणखी आहेत...