आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मायलेकीची आत्महत्या; तरुणाला अटक

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या मोबाइलवर अश्लील चॅटिंग करणाऱ्या तरुणाच्या छळाला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथे मुलीसह तिच्या आईने आत्महत्या केली असून याप्रकरणी मायलेकीस आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणाला ढोकी पोलिसांनी अटक केली आहे.भंडारवाडी येथील रणजित श्रीकांत मारकड (२०) हा संबंधित मुलीला मोबाइलवर सतत त्रास देत होता. व्हाॅट्सअॅप मेसेज करून फिर्यादीच्या कुटुंबाला त्रास देत होता. मुलीला व कुटुंबीयांना होत असलेल्या त्रासातून मुलीने व तिच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पोलिसांनी रणजित मारकड याला अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...