आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस:एमआयएम पदाधिकारी काँग्रेसमध्ये

कळंब8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएम पक्षाचे कळंब तालुकाध्यक्ष वाजेद काझी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.मुरूम येथील विठ्ठल साई कारखाना येथे हा कार्यक्रम झाला. माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत व तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे कळंब तालुका प्रमुख वाजिद काझी, शहर कार्यकारी अध्यक्ष हनुमंत दोडके,आरेफ खान, असद आली सय्यद,वाजिद शेख,महेश मोहिते,अस्लम शेख, जनक महाजन,विनोद चव्हाण,तसेच महिला पदाधिकारी पूजा नकाते, सुनिता जाधव,कानाबाई जाधव, प्रेम नकाते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सुफी संतांचा राहुल गांधी यांच्या सोबत परिसंवाद घडवून आणल्याबद्दल कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांचा बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस,काँग्रेस पक्षाचे कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार,महिला जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सपाटे, तालुका महिला अध्यक्षा अंजली ढवळे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, शशिकांत निर्फळ, शहाजान शिकलगार,शिवानंद शिनगारे,मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष विश्वंभर मैदाड,भाग्यश्री ढवळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...