आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनराई खाक:उमरगा जिल्हा परिषद शाळेतील मियावॉकी जंगलात लावली आग; 25 झाडे जळाली

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या खुल्या जागेवर शाळेसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या पुढाकारातून पाच हजाराहून अधिक झाडांचे संगोपन करण्यात आले. तीन वर्षांपासून मियावॉकी जंगल तयार करुन ऑक्सिजन हब निर्माण करण्यात आला आहे.

परंतु प्रशालेतील मियावॉकी जंगलात सोमवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास काही समाजकंटकांनी आग लावली. यात २५ झाडे जळाली. शालेय परिसरातील जोशी काका, शाळेचे माजी विद्यार्थी खंडू औरादे यांची सतर्कता व शाळेच्या सेविका राठोड ताई, रवी वाले, दहावीतील विद्यार्थ्याच्या प्रयत्नामुळे आगीने होणारे मोठे नुकसान टळले. दरम्यान, मागील आठ दिवस झाडांना भरपूर पाणी घालण्यात आले. त्यामुळे परिसर व मियावॉकी जंगलातील गवत ओले होते. त्यामुळे पेट घेतला नसल्याने मोठी हानी टळली. या समाजातकी प्रवृत्तीचा मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी निषेध केला आहे. तसेच जोशी काका, खंडू औरादे यांच्या शाळेप्रती तळमळीबद्दल आभार मानले. रात्री माहिती मिळताच मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत येऊन पाहणी केली. रात्री शाळेचा बोअरवेल सुरू करुन आग विझवण्यात रवी वाले, राठोड मावशींनी यश मिळवले होते. घटनेबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार करुन बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांना माहिती देणार असल्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...