आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण:कलदेव निंबाळा ग्रामपंचायतीकडून मियावाकी वृक्षलागवड

उमरगा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कलदेव निंबाळा जिल्हा परिषद शाळा परिसर, गावांतर्गत रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत असून प्रत्येक कुटुंबाला रोपांचे वाटप करण्यात येत आहे. लागवड करण्यात आलेल्या रोपांचे ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्या वतीने संगोपन करण्यात येणार आहे.

गावातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रेमाणात वृक्ष लागवड करण्यात येत असून यामध्ये गावातील समाज मंदीरे, स्मशानभूमी, अंतर्गत व मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने घनदाट वृक्ष लागवड अन् संगोपन करण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय गावातील प्रत्येक कुटुंबाला वृक्षभेट देवून घरोघरी व परिसरात लागवड करण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी ग्रामसेवक सुनील पांचाळ, तलाठी अश्विनी गोजमाळे, सेवा सोसायटीचे चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील, पोलिस पाटील पांडुरंग पाटील, ग्राप सदस्य छाया भालेराव, कलाकार पाटील,रमेश पाटील, किरण स्वामी, यशोदा गायकवाड, अशोक सुर्यवंशी, दयानंद सुर्यवंशी, मारुती सुरवसे, बालाजी कुलकर्णी, किसन बलसुरे, गहिनीनाथ बिराजदार, बालाजी गुरव, राजोत्तम गायकवाड, उत्तम सरवदे, गजेंद्र पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

४० हून अधिक दुर्मिळ झाडांची लागवड
सरपंच सुनिता पावशेरे म्हणाल्या की, मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून कमीत-कमी जागेत अधिक वृक्षांची लागवड केली जाते. मोठे, उंच, मध्यम व लहान अशा ४० पेक्षाही जास्त देशी परंतु दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाणार आहे. मियावाकी पद्धतीने घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, ग्रामपंचायत, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा लागवड करण्यात येत आहे. यात देशी वृक्षांची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासह वृक्षसंवर्धनाचे धडेही मिळतात.

बातम्या आणखी आहेत...