आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसा सिंचन योजना:आमदार पाटील यांनी केली पंपगृहाची पाहणी ; कामाचा घेतला आढावा

तामलवाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील पांगरदवाडी येथील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजने अंतर्गत टप्पा क्रमांक ४ मधील पंपगृहाची आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी गुरुवारी (दि.२७) संयुक्तिक पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच काम तत्काळ पुर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मराठवाड्याचे हक्काचे २१ टीएमसी पाणी उजनी धरणातून मराठवाड्यात आणन्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००८ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. २०१० मध्ये कामाची सुरवात करण्यात आली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, विजय निंबाळकर, सरपंच बालाजी शिंदे, नारायण नन्नवरे, राजकुमार पाटील, यशवंत लोंढे, बालाजी डोंगरे, सोमनाथ शिंदे, शंकर कदम, बापु साळुंके, महेश सावंत आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...