आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायरान आणि गावठाण जमिनींवर दीर्घकाळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नियमित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करणार, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नियमित करण्याचा व घरकुल देण्याचा महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्याला मंगळवारच्या (दि.१३) बैठकीत पुष्टी मिळाली. राज्य सरकार या संदर्भात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करणार आहेत. या दिलासादायक निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज व संभ्रम झालेले वातावरण दूर होऊन लाखो कुटुंबांना अधिकृत जागा व हक्काचे घर मिळणार आहे.
गावठाण क्षेत्रात निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्याबाबत ३१ डिसेंबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. याबाबत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी परिपत्रक काढले असून ते सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना यांना कळवण्यात आले आहे. त्यात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्याने करावयाच्या कार्यवाहीचा कालावधी निश्चित करण्यात आला. अशा सर्व जागांवर दीर्घ काळापासून राहत असणाऱ्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नियमित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.