आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:‘भाजप आपल्या गावी’ अभियानातून सत्ताधारी लाेकप्रतिनिधींवर आमदार राणा पाटील यांचे वार

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आपल्या गावी अभियान राबवत असून, या अभियानाची सुरुवात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अंबेजवळगा येथून करण्यात आली.यावेळी त्यांनी सत्ताधारी लाेकप्रतिनिधींवर टीकेचे बाण सोडले. ते म्हणाले, हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कबाबत सत्ताधारी बोलत का नाहीत.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विकासाबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष असून सुमारे १० हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कबाबत राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. आमदार, खासदार, पालकमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे असताना अनेक वेळा मागणी करूनही याबाबत साधी बैठक का बोलावली जात नाही, सत्ताधारी लोकप्रतिनिधी याबाबत बोलायला का तयार नाहीत, असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतू महाविकास आघाडी सरकारने यावर पुढे काहीही कार्यवाही केली नाही. केंद्र सरकारचे या उद्योगासाठी मोठे अनुदान उपलब्ध असताना त्यांच्याकडे साधा प्रस्तावही राज्य सरकारकडून पाठविला जात नाही, ही अत्यंत संतापजनक बाब आहे. मात्र कौडगाव एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग उभे करून रोजगार निर्मिती हे आपले स्वप्न असून ते पुर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत.

सत्ताधाऱ्यांनी अडीच वर्षात काय केले
सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी गेल्या अडीच वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी आणि आपल्या गावासाठी नेमकं काय केले, ठराविक रस्ते व अनुषंगिक गुत्तेदारीच्या पलीकडे जाऊन जिल्ह्यात कुठलेच भरीव काम झालेले नाही हे कटू वास्तव आहे. आपले आमदार, खासदार पालकमंत्री सेनेचेच असताना देखील यांनी जनतेसाठी काय केले,हे सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...