आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना फुटीचे पडसाद:आमदार संजय राठोड तुम्ही परत या, उस्मानाबादेत बंजारा बांधवांची साद

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतील बंडखोरीचे पडसाद गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातही पाहण्यास मिळाले. आता रविवारीही याचा प्रभाव कायम असल्याचे जाणवले. बंजारा समाजातील शिवसैनिक युवासेना व बांधवांनी भावनिक साद घालत आमदार संजय राठोड यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेत बंडखोरी केल्यावर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाच्या फलकाची तोडफोड झाली. नंतर त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाची स्वच्छता केली. रविवारीही याचा परिणाम दिसून आला. बंजारा समाजाच्या शिवसैनिक व युवासैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून आमदार राठोड यांना परत शिवसेनेत येण्यासाठी साद घातली. शिवसेनेने आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार संजय राठोड यांना आयुष्यात मोठे केले. मंत्रिपदासह सर्वकाही भरभरुन दिले, त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा न करता परत उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे यावे, अशी भावनिक साद बंजारा भाषेतून