आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधाराशिव जिल्ह्यातही तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी राव यांच्या निवासस्थानी समितीमध्ये प्रवेश केला आहे. राव यांनी नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले आहेत. आता त्यांनी धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
यामुळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात चाचपणी सुरू केल्याचे समजते. नवगिरे मागील २८ वर्षांपासून राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेपासून कार्य करत होते. त्यांनी जिल्हा संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जनतेच्या विकासासाठी असलेली दूरदृष्टी, प्रचंड इच्छाशक्ती व त्यांचे सर्वसामान्य जनतेसाठी सुरू असलेले कार्य बघून प्रेरीत होत प्रवेश केल्याचे नवगिरे यांनी सांगितले.
यापुढे महाराष्ट्रात या पक्षाचे जाळे वाढवून पक्षसंघटन वाढवणार असल्याचेही नवगिरे म्हणाले. प्रवेशावेळी आमदार जीवन रेड्डी, चंद्रशेखर राव यांचे विश्वासू प्रविण जेठेवाड, शंकरराव धोंडगे, रणजीत देशमुख उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.