आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:नगरपरिषद निवडणुकीत मनसे स्वतंत्रपणे लढणार; विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने यांची माहिती

उमरगा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्वतंत्रपणे लढणार, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष शाहूराज माने यांनी दिली.पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. ते म्हणाले की, उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत १२ प्रभाग व २५ उमेदवार सर्व प्रभागातील आरक्षणनिहाय उमेदवार उभे करण्याची तयारी झाली आहे. युवकांना उमेदवारी देण्यास प्राधान्य असणार, असे माने यांनी सांगितले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. मनसे युवकांना सोबत घेऊन निश्चितच शहराचा विकास करेल, असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंखे यांनी व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे उमरगा नगरपरिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणी अर्ज भरून देण्याचे आवाहन मनसे विधानसभा अध्यक्ष माने यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष हरी जाधव, शहराध्यक्ष हणमंत बनसोडे, मनविसेचे मराठवाडा उपाध्यक्ष किरण कांबळे, जयकुमार घोगरे, आकाश कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...