आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोबाइल तपास; कोंड येथे‎ पोलिसांवर दगडफेक‎

धाराशिव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोंड येथे मोबाइल चोरीच्या‎ तपासासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे‎ शाखेच्या पथकावर दगडफेक केल्याची‎ घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता‎ घडली.‎ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस‎ उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहळ‎ यांच्यासह पोलिस पथक कोंड गावात‎ चोरीच्या मोबाइल संबंधी तपासासाठी‎ गेले होते. यावेळी त्यांनी नवनाथ भोसले,‎ नारायण भोसले, तानाजी जाधव,‎ सोमनाथ भोंग यांच्याकडे विचारपूस‎ असता त्यांनी स्थानिग गुन्हे शाखेच्या‎ पथकाला शिवीगाळ केली.

पोलिसांनी‎ त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता‎ नवनाथ भोसले याने पोलिस पथकावर‎ दगड फेकून मारला. सर्वांनी जाणीवपूर्वक‎ दहशत निर्माण करुन पोलिसांच्या‎ तपासात अडथळा आणला.‎ पोउपनिरीक्षक संदीप ओहळ यांच्या‎ फिर्यादीवरून संबंधितांवर ढोकी पोलिस‎ ठाण्यात शासकीय कामात अडथळा‎ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...