आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:भाजयुमाेचे धन्यवाद मोदीजी अभियान सुरू ; अमोल निडवदे यांनी केले मार्गदर्शन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता युवा मोर्चाची भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे आढावा बैठक पार पडली. यात धन्यवाद मोदीजी अंत्योदय ते भारत उद्या या अभियानाची उस्मानाबाद व तुळजापुरमधून सुरु करण्यात आली.या बैठकी प्रसंगी अमोल निडवदे यांनी मार्गदर्शन केले व आपण युवा मोर्चा म्हणून येणाऱ्या काळात काय काम करायचे आहे आपल्या जबाबदाऱ्या याविषयीची माहिती दिली.

जिल्हयातील केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या हस्ताक्षरात धन्यवाद मोदीजी असे पोस्ट कार्ड भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. साधारणत: ७ हजार पोस्ट कार्ड जिल्हयातून पाठवण्यात येणार आहेत. गाव व शहरात प्रभाग तिथे भाजयुमोची युवा वॉरियर्स शाखा करण्याचा संकल्प केला आहे. तसेच २०२४ पर्यंत नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रभाग तेथे कॅम्प लावण्यात येणार आहे. यावेळी या अभियानांसाठी संयोजकांच्या निवडी करण्यात आल्या.याप्रसंगी सुनिल काकडे, अभय इंगळे, सुजित साळुंके, शेषेराव उंबरे, प्रवीण शिरसाठे, देवा नाईकल, अमोल राजेनिंबाळकर, सुनील पंगुडवाले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...