आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:महिलेचा विनयभंग; ग्रामस्थांचा खोटी अॅट्रॉसिटी दाखल केल्याचा आरोप

तेरखेडा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे फिर्यादी २२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद येरमाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ही घटना २८ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला उकरंडे शिवारातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये पती व लहान मुलासोबत राहते. ती रात्री घरात एकटी असल्याचे बघून पप्पू उकरंडे या तरुणाने तिला वाईट हेतूने स्पर्श केला. अभद्र भाषा वापरत विनयभंग केला, अशी तक्रार महिलेने येरमाळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

घटनेच्या अधिक तपासासाठी कळंब येथील सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश रविवारी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपास केला. दरम्यान, फिर्यादीने खोटा गुन्हा नोंद केल्याचा आरोप छाया उकरंडे यांनी केला आहे.

यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांना निवेदन देत खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी, प्रभारी सपोनि नेहरकर पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...