आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:विविध मागण्यांसाठी रिपाइंचा उमरगा, तुळजापूर, परंडा येथे मोर्चा व निदर्शने; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आवाहनाला राज्यात प्रतिसाद

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा
महाराष्ट्र राज्यभर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आदेशानुसार मंगळवारी (१०) विविध मागण्या मान्य करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निदर्शने करत तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आरपीआय तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष बाबा गायकवाड, महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई कांबळे, उपाध्यक्ष दगडू भोसले, गौतम सूर्यवंशी, कृष्णा कांबळे, सागर मस्के, अक्षय कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

परंड्यामध्ये आंदोलन
रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी निदर्शने करुन तहसीलदार यांना मंगळवार (दि.१०) निवेदन देण्यात आले.
निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे, तालुकाध्यक्ष फकीरा सुरवसे, आकाश बनसोडे तानाजी सोनवणे, भास्कर ओव्हाळ, उत्तम ओव्हाळ हरिभाऊ आडगळे, बाबा गायकवाड, भिमराव भोसले, विलास भोसले, बाबा शिंदे, काशिनाथ सातपुते, सागर रंदील, रामभाऊ गोरे, सोमनाथ काकडे, भास्कर ओव्हाळ, जयराम साळवे, विजय ठोसर, धनाजी यशवद, चंद्रकांत परिहार, बाळासाहेब चतुर, प्रितम ओव्हाळ, हनुमंत शिंदे लक्ष्मन सरवदे, हनुमंत प्रतापे, भिमराव भोसले, रावसाहेब चव्हाण आदीची स्वाक्षरी आहे.

तुळजापूरमध्ये आंदोलन
तुळजापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील शासकीय विश्रामगृह येथून मोर्चा ला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नगर परिषदमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या राज्यव्यापी आंदोलनामध्ये अन्य काही मागण्यांचाही समावेश होता. लोहारा तालुक्यातील काणेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी परवानगी नाकारणे, तेथील अंकुश गायकवाड यांने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास करण्यात यावा, आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी आदी विविध मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या आहेत मागण्या
मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनुसूचित जाती/जमाती व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण देण्यात यावे, गायरान जमिनी कसणाऱ्या इतर मागासवर्गीय कुटुंबाचे नावे पाच एकर जमिनी देण्यात यावे, देशात आणि राज्यात महागाईचा भस्मासुर वाढला असून त्वरित इंधन, गॅस अन इतर वस्तूवरील महागाई कमी करावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ओबीसींना आरक्षण मिळावे, महाराष्ट्र राज्यातील दलितांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे ती त्वरित थांबण्यात यावी, दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत किमतीचे निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी,रमाई आवास योजनेचे अनुदान अडीच लाखाहून पाच लाख करण्यात यावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अर्जांचा त्वरित निपटारा करावा, राज्यातील २००० पर्यंतच्या झोपडपट्टया कायम करण्यात याव्यात, राज्यातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या मंजूर झाले अर्ज त्वरित कर्ज वाटप करावे, लोहारा तालुक्यातील कानेगावचे बुध्द विहाराच्या वादात अंकुश गायकवाड यांची आत्महत्या की हत्या याचे तपास करावा व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशा मागण्यांसाठी निदर्शने करत मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...