आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:प्रोत्साहनपर 50 हजार अनुदानासाठी डीसीसीचे अधिक लाभार्थी, अन्य बँकांना नगण्य स्थान

उस्मानाबाद / उपेंद्र कटकेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ७१ हजार ७४० शेतकरी लाभार्थींची माहिती शासनाकडे देण्यात आली आहे. मात्र, अनुदानासाठी ४० हजार ४८३ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्येही तब्बल ३५ हजारापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेच लाभार्थी शेतकरी आहेत. उर्वरित सर्व बँकांच्या लाभार्थींची संख्या नगण्य असून यामुळे या बँकांचे कर्जदार आपले नाव कधी येणार याची प्रतीक्षा करत आहेत.

पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना सुरू केली. यातून आता अनुदानाचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे. २०१७ – २०१८, २०१८ – २०१९, २०१९ – २०२० यातीन वर्षात पिककर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकरी लाभार्थिंना या योजनेतून ५० हजार रुपये देण्यात येत आहे. यासाठी तब्बल एक वर्षापूर्वीच बँकांना माहिती मागवली होती. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशा शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली आहे. यामध्ये ७१ हजार ७४० शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती.

यातील ४० हजार ४८३ शेतकऱ्यांची यादी शासनाने जाहिर केली आहे. मात्र, यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ३५ हजारांच्या जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँकेचेच लाभार्थी आहेत.अन्य ग्रामीण व राष्ट्रीयीकृत बँकांच्या लाभार्थींची संख्या अत्यंत नगण्य आहे. यामुळे लाभार्थींना अद्यापही लाभ मिळालेला नाही. पहिली यादी येऊन बराच काळ लोटला. अद्याप दुसरी यादी आली नसल्यामुळे या लाभार्थींची धाकधुक वाढली आहे.

डीसीसीच्या लाभार्थींना ७५ कोटी आतापर्यंत ३१ हजार ३४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये ९४ कोटी ३८ लाख रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये २७ हजार ३७० लाभार्थी एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत. त्यांना ७५ कोटी ५८ लाख रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम अन्य बँकांच्या लाभार्थींना मिळाली आहे. आता अन्य बँकेचे लाभार्थीही अनुदान मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.

३७ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण
पूर्वीच्या कर्जमाफी योजनांच्या तुलनेत यावेळी आधार प्रमाणीकरण करण्याचा वेग अधिक आहे. आतापर्यंत यादीत जाहिर करण्यात आलेल्या ४० हजार ४८३ शेतकऱ्यांपैकी ३७ हजार ३३९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. ३१४१ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यांना प्रक्रिया करण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेतील प्रयत्नशिल आहेत.

बँकेत सातत्याने फेऱ्या नियमित पिककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना व उद्धव ठाकरे असतानाही देण्यात आली नाही. यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, अद्यापही अनुदान मिळालेले नाही. यामुळे असे लाभार्थी सातत्याने बँकेत फेऱ्या मारून अधिकाऱ्यांना भंडावून सोडत आहेत.

६०७ गावांतील लाभार्थी
सध्या यामध्ये ६०७ गावांतील लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक १११ गावे उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. अनेक शेतकऱ्यांना बोटांचे ठसे मॅच होत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांची नावे योजनेत येण्यासाठी मोठी प्रक्रिया आहे. यासाठीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...