आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांची यात्रा:भारत जोडो यात्रेच्या समर्थनासाठी उमरग्यात मोटारसायकल रॅली

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.३१) उमरगा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे.

सदरील भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ सोमवारी (दि. ३१) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरगा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, जिल्हा सरचिटणीस गौस शेख, सचिन पाटील, विजय वाघमारे, राहुल हेबळे, पप्पू सगर, महेश माशाळकर, भरत मारेकर, विक्रम मस्के, वसीम शेख, राहुल सरपे, ब्रम्हानंद पाटील, राजू मुल्ला, राहुल वाघ, याकुब लदाप, यशपाल कांबळे, श्रीहरी पाटील, रोहित कारभारी, विक्रम दासमे, महादेव कारभारी, सोहेल इनामदार आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...