आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:लोकजन शक्तीकडून मागण्यांसाठी आंदोलन

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकजन शक्ती पार्टी (आर) च्या वतीने विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. लोकजनशक्ती पार्टी (आर) च्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३० मे २०२२ रोजी पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. जातीच्या प्रमाणपत्रासाठी ज्याचे पुरावे उपलब्ध नाहीत, त्यांची मंडळाधिकारी, तलाठी यांच्यामार्फत स्थानिक चौकशी अहवालानुसार त्यांना प्रमाणपत्र द्यावे, अशा विविध मागण्या करीता धरणे अंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये राजाभाऊ गायकवाड, भारत कदम, नाना धिरे, गौतम हजारे, बजरंग धावारे, सुनील गायकवाड, रेखा चंदनशिवे, चंदनशिवे, सुलभा व मालन गायकवाड सहभागी आहेत.

बातम्या आणखी आहेत...