आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:महिन्याच्या एक तारखेला‎ वेतन करण्यासाठी आंदोलन‎

धाराशिव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे‎ वेतन एक तारखेला करण्याच्या‎ मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा‎ परिषद आरोग्य सेवा कर्मचारी‎ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमोर सोमवारी (दि.१३)‎ धरणे आंदोलन करण्यात आले.‎ निवेदनात म्हटले आहे की,‎ जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे‎ वेतन २०२२-२३ मध्ये एक तारखेला‎ एकाही महिन्यात झालेले नाही.‎

जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी‎ स्त्री व पुरुष निकषांचे काम १००‎ टक्के उद्दिष्टानुसार करत आहेत.‎ त्यामुळे जिल्हा सतत पहिल्या पाच‎ क्रमांकांमध्ये राहिला आहे.‎ फेब्रुवारीचे वेतन दि.१० मार्चपर्यंत‎ झाले नाही. ते प्रत्येक महिन्याच्या‎ एक तारखेला करावे. वेतन वेळेत‎ होत नसल्याने गृह कर्जाचे हप्ते,‎ वैद्यकीय उपचार व शिक्षणासाठी‎ लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव‎ करण्यात अडचण येत आहे.‎ आंदोलनात जिल्हाध्यक्ष शरद मुंडे,‎ कार्याध्यक्ष सुनील मिसाळ, सचिव‎ संतोष शिंदे, कोषाध्यक्ष पांडुरंग‎ पांचाळ आदींसह कर्मचारी या‎ आंदोलनात सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...