आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडायला कधीही तयार:सोन्याचा चमचा अन् चमचे मंडळीद्वारे रुबाब करायची त्यांना सवय- राणा जगजितसिंहांवर ओमराजेंची टीका

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"सोन्याचा चमचा घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे. परंतु, त्यांचा सामना आज या "पवनराजे" निंबाळकरांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल. जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही." असा खणखणीत इशारा शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय वैरी असलेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दिला.

कालच राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात पीकविमा बैठकीवरुन जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी या दोन परिवारातील वाद उफाळून आला आहे.

काय घडले काल?

उस्मानाबादेत खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात पीकविम्याच्या मुद्यावर त्यांच्यात हमरी- तुमरी झाली आणि अरे तुरेची भाषाही उभयतांनी वापरली. हा प्रकार उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी घडला होता.

हमरी - तुमरी

काल जिल्हाधिकारी कार्यालयात पीकविम्याची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात राणा जगजितसिंह पाटील हे एकटेच होते. शेतकऱ्यांच्या मागणीवर खासदार ओमराजे निंबाळकर तिथे पोहचले. जिल्हाधिकारी यांना त्यांनी काही प्रश्न विचारले.राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांना टोकले. त्यानंतर तू बाळ आहेस असा उल्लेख केला. यावरुन संतापलेल्या ओमराजे यांनी राणा जगजितसिंह यांना औकातीत राहण्याची भाषा वापरली. यादरम्यान त्यांच्यात मोठा वादही झाला. एकमेकांना हमरी - तुमरीची भाषा वापरली गेली.

संस्काराच्या वक्तव्यावरुन वाद उग्र

राणा जगजितसिंह पाटील यांना ओमराजे निंबाळकर यांच्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार ते बोलले असे वक्तव्यही यावेळी केली. त्यानंतर पुन्हा ओमराजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. राणा जगजितसिंह यांनी ओमराजें यांचा बाळ असा उल्लेख केला. यावर तु मला सांगू नको तुझी औकात काय अशी भाषा वापरली.

ओमराजेंची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी

''जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा बाबतीत न्याय भेटावा म्हणून मी व माझे सहकारी आमदार कैलास पाटील व नंदुभैय्या राजेनिंबाळकर लढा देत आहोत, यामागे एकच हेतू की भरडलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा. याबाबतीत समोरील आमदार ह्यांना करायचे काही नाही पण श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी कितीही आटापिटा केला तरी जनता दूधखुळी नाही व ती सगळे पाहत आहे.

कलेक्टर कचेरीत याबाबतीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. "सोन्याचा चमचा" घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे परंतु त्यांचा सामना आज या "पवनराजे" साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल.

यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तानने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे.

लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते, आता लोकांच्या जहागिरी व जहागीरदारी दोन्ही संपल्या आहेत. तुम्ही दहशतीने आम्हाला दाबाल व आम्ही दबू असा गैरसमज आज मिटला असेल.

राजकारणात लोकांच्या साठी राजकारण करताना मी कायमच वैयक्तिक हेवेदावे टाळत असतो, आम्ही शांत असतो पण षंढ नसतो. आज समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत, फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे.

पुन्हा पोस्ट 'वाॅर'

नया है वह ! बहुदा या सगळ्यांना कालच्या पोस्ट मुळे रात्रभर झोप आली नाही. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आता हे सगळे frustrated आहेत त्यामुळे यांच्या साठी

"Get well soon" ची प्रार्थना करू यात. (टीप - यांचे रात्री 9 नंतर आलेले पोस्ट, व्हिडिओ मनावर घेऊ नये कारण यांचा रात्रीस कोणता खेळ चाले हे सगळेच जाणून आहेत.) असा मजकूरही ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिला.

बातम्या आणखी आहेत...