आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभेच्या दहाव्या सत्राच्या हिवाळी अधिवेशनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शून्य प्रहराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता ५० टक्के आरक्षण मर्यादा वाढवणे गरजेचे आहे. तसेच लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी बुधवारी केली.
यावेळी त्यांनी म्हटले की, मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण दिल्यास इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देता येईल अशी कायदे दुरुस्ती करावी. त्यामुळे विकासापासून दुर असणाऱ्या मराठा समाजास न्याय मिळेल तसेच महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा. कायदा दुरुस्ती करुन मराठा समाजास आरक्षण मर्यादा वाढवावी व १२ व्या शतकातील महान संत समाजसुधारक कवी असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. हा लिंगायत समाज महाराष्ट्र व शेजारील कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळुन येतो.
स्वतंत्र पुर्व काळात लिंगायत समाज हा अल्पसंख्यांक असल्याचे तत्कालीन सरकारी कागदपत्रांतील नोंद उपलब्ध आहे. मागील अनेक वर्षापासून या समाजाने अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तरी अद्याप या समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळालेला नाही. आज रोजी महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सात टक्के लोकसंख्या ही लिंगायत धर्माचे आचरण व पालन करणारी आहे. अल्पसंख्यांक म्हणून हा समाज घटनात्मक सवलती पासून वंचित आहे. या समाजास लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळाली तर सांस्कृतिक आणि औद्योगिक विकासासाठी या समाजाला मदत होईल असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.