आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:श्री. खंडोबा देवस्थान संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थानची जमीन बेकायदेशीरपणे नावे करुन विक्री केल्याप्रकरणी तसेच एकतर्फी झालेले ट्रस्ट बरखास्त करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबा देवस्थान संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात श्री खंडोबा देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थ सहभागी झाले.

विविध मागण्यांसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढलेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इनामी जमिनी खरेदी-विक्री करणाऱ्या पुजाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन देवस्थानच्या तीन हजार एकर जमिनीवर भोगवटादार वर्ग २ ची नोंद घ्यावी, देवस्थानच्या नावे असलेली सर्व जमीन साताबारावर भोगवटादाराचे नाव खंडोबा देवस्थान अणदूर प्रतिबंधित सत्ता प्रकार असे करुन कुळ खंड व इतर अधिकारात श्री खंडोबा सेवा करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चामध्ये श्री खंडोबा देवस्थान संघर्ष समितीचे अरविंद घोडके, सोमनाथ शेटे, बालाजी कुलकर्णी, दीपक घोडके, बाळकृष्ण घोडके, कल्याणी मुळे, निलेश मुळे, उमाकांत आलुरे, श्रीशैल्य लंगडे, तिप्पू कबाडे, श्याम गायकवाड, अंकुश कांबळे यांच्यासह देवस्थानचे मानकरी, महिला-पुरूष सहभागी झाले होते.

.. तर घोडके यांना एक लाखाचे बक्षीस देऊ
श्री खंडोबा देवस्थानचा कारभार पारदर्शक असून, देवस्थानच्या जमिनीवर डोळा ठेवून काही जण नाहक बदनामी करताहेत. अरविंद घोडके यांनी देवस्थानकडे ३ ते ४ हजार एकर जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यांना एक लाखाचे बक्षीस देईल आणि हे खोटे ठरल्यास त्यांनी देवस्थानची माफी मागावी, असे आव्हान मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिले. घोडके यांनी देवस्थानकडे ३ ते ४ हजार एकर जमीन असल्याचे सांगून, गुरव समाज शेतजमिनीची विक्री करत असल्याचा खोटा आरोप केला. देवस्थानच्या नावे केवळ ८०० ते ९०० एकर जमीन असून पैकी २५० एकर जमीन देवस्थानच्या देखभालीसाठी राखीव ठेवली आहे. देवस्थान समिती (ट्रस्ट) १९६५ मध्ये स्थापन झाली असून, वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट-अ मिळाला. न्यायालयाने जमिनीसंदर्भात देवस्थानच्या बाजूने निकाल दिल्याचे ढेपे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...