आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा‎:तुती अनुदान नाही; आत्मदहनाचा इशारा‎

उस्मानाबाद‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे शासन प्रशासनाकडून‎ तुती-ची जिल्ह्यात लागवड‎ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात‎ शेतकऱ्यांना प्रेरीत करत आहे.‎ दुसरीकडे मात्र, ज्या शेतकऱ्यांनी‎ तुती-ची लागवड केली, त्यांना‎ दोन वर्षानंतरही अनुदान मिळाले‎ नसल्याचा प्रकार समोर आला.‎ विशेष म्हणजे अनुदान मिळत‎ नसल्याने महिला शेतकऱ्याने‎ आत्मदहन करण्याचा इशाराही‎ तहसीलदारांना दिला.‎

या प्रकरणी वाशी येथील‎ तहसीलदारांना दिलेल्या‎ निवेदनानुसार वाशी येथील शोभा‎ ऊर्फ कडुबाई संदीपान वाळके‎ यांनी जुलै २०२० मध्ये रोजगार‎ हमी योजनेतून तुती लागवड‎ केली. रेशीम कार्यालयाचे बंडगर‎ यांनी पाहणी करुन फोटो काढत‎ मला काही तोडी पाणी मिळावी‎ अशी मागणी केली. त्यानंतर दिड‎ हजार रुपये दिले. मात्र, दुसऱ्या‎ दिवशी आणखी ३५ हजार‎ रुपयांची मागणी केली.‎

बातम्या आणखी आहेत...