आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळीची तयारी:नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, निवडणुकीच्या मुहूर्ताबाबत अद्याप संभ्रम ; रणधुमाळीची तयारी : उमरग्यात नगरसेवकांची संख्या 22 वरून पोहोचली 25 वर

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपरिषद निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, प्रक्रिया अंतिम झाल्यावर निवडणुकीची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर केली असून, शहरात नगरसेवकांची संख्या २२ वरून २५ झाली आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागण्याची शक्यता आहे. सध्या सर्वात मोठा प्रभाग १२ असून त्यात ३ नगरसेवक निवडून द्यायचे असून, यात ५१२३ मतदार आहेत. सर्वात लहान प्रभाग ६ असून त्यामध्ये ३०७६ मतदार आहेत. प्रभाग सहा अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित असून गत पंचवार्षिकमध्ये अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारणसाठी आरक्षित होता. नगरपरिषदेच्या मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास काही प्रभागात राजकीय पक्षांकडून उमेदवारी देताना तडजोड करण्यात येत असल्याचे दिसून येते. जेथे ज्या पक्षाचा प्रबळ उमेदवार आहे, तेथे दुसऱ्या पक्षाच्या नवख्या उमेदवारास उभे करून एक प्रकारे विजयी करण्याचा प्रकार घडले आहेत. राजकीय रणधुमाळीमध्ये कोणत्या पक्षाचे कोणाशी सुत जुळणार यावरुन कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...