आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नगरपरिषदेची मतदार यादी शनिवारी होणार प्रसिद्ध; निवडणूक आयोगाने दिली पाच दिवसांची मुदतवाढ

उस्मानाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील अ वर्गातील नगरपरिषदांची मतदारयादी प्रसिद्ध होणार 25 जून रोजी

नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने २१ जून रोजी मतदार यादी जाहीर करण्याची तारीख दिली होती. मात्र, १७ जून रोजी आयोगाने राज्यातील अ वर्गातील नगर परिषदांना २५ जून रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची सूचना केली. त्यामुळे पाच दिवसांनी अ वर्गाच्या नगरपरिषदांचा मतदार यादी कार्यक्रम प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

या बाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, २२ ते २४ जून या कालावधीत महाराष्ट्र विधान मंडळातील ३५ विधानसभा सदस्यांच्या अंदाज समितीचा पाहणी दौरा आहे. याच दरम्यान प्रभाग निहाय मतदार यादीची विभागणी करायची आहे.

जिल्ह्यातील सात नगर परिषदांत मतदार यादी प्रसिद्ध
जिल्ह्यातील तुळजापूर, कळंब, परंडा, भूम, नळदुर्ग, उमरगा आणि मुरूम नगर परिषदेत मंगळवारी प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात २७ जून पर्यंत हरकती, दावे, आक्षेप नोंदवता येणार आहे. त्यानंतर यावर दुरुस्ती करुन एक जून रोजी मतदार यादी अंतीम होईल. मात्र, पाच जुलै रोजी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदार, लोकसंख्येचा व्याप असल्याने मुदतवाढ
आपली नगरपरिषद अ वर्गातील असून लोकसंख्या व मतदारांचा व्याप अधिक असल्याने समितीची पाहणी दौरा व प्रभाग निहाय मतदार यादीचा कार्यक्रम करण्यासाठी विलंब लागणार होता. हे लक्षात घेऊन आयोगाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार यादी प्रसिद्ध होईल.
हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी.

बातम्या आणखी आहेत...