आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नगर परिषदांना मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश, लवकरच वाजणार निवडणुकांचा बिगुल; 31 मे 2022 पर्यंतच्या मतदारांचा समावेश

हरेंद्र केंदाळे | उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील २०८ नगर परिषदा आणि १३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे. १० जून रोजी तसे आदेश काढले असून शनिवारी नगर परिषदांना प्राप्त झाले आहेत. ३१ मे २०२२ पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचा या यादीत समावेश असेल. त्यानुसार आगामी काही महिन्यांत या सर्वच पालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

राज्यातील एप्रिल २०२० ते जून २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा २०८ नगर परिषदा आणि १३ नगरपंचायतींच्या अशा २२१ सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना, दुसऱ्या टप्प्यात भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा निहाय मतदार यादीचे कटऑफ निश्चित करून प्रभाग निहाय व मतदान केंद्र निहाय यादीचे विभाजन करून प्रसिद्ध करणे. तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष निवडणूक असणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा झाला असून सोमवारी १३ जून रोजी प्रभाग आरक्षण सोडत होणार आहे. त्यानंतर मतदार यादी कार्यक्रम तत्काळ अवलंबणार आहे. ५ जुलैपर्यंत मतदार यादीचे अंतिम काम संपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष निवडणुकीची आचारसंहिता आणि मतदानाची तारीख निश्चित होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मतदान यादीचे काम वेळेत होणार
^मतदान यादी अंतिम करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असल्याने ही कामे करण्यात येत आहेत. आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे मतदार यादी ३१ मे २०२२ पर्यंतचा कटऑफ ठेवून अंतिम करण्यात येईल. यात ८६ हजार मतदार वाढले आहेत.
- हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद.

असा आहे निवडणुकांचा कार्यक्रम
-प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे - २१ जून -२०२२
-प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना मागवणे-२१ ते २७ जून
-अंतिम प्रभागनिहाय यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे - १ जुलै
-मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे
- ५ जुलै २०२२

बातम्या आणखी आहेत...