आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची बैठक सुरू असतानाच थोडासा पाऊस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच पाण्याचा डोह साठला. एरव्ही शांतपणे काम करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खुद्द केंद्रीय राज्य मंत्र्यांसमोर प्रशासनाची फजिती होऊ नये म्हणून पळापळी काढून पाणी काढून टाकले. पूर्वीही गेट समोरील नालीवरील जाळी बांधकामानंतर एकाच महिन्यात कोसळण्याचा प्रकार घडला होता.
शनिवारी दुपारी झालेल्या हलक्या पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐन प्रवेशद्वारातच तळे साचले. आज जिल्हा दौर्यावर असलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन अनेकांना झाले. प्रवेशद्वारात आणि परिसरात डांबरीकरण करण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दक्षता न घेतल्यामुळे हे काम व्यवस्थित झालेले दिसून येत नाही. हलक्या पावसानंतर चक्क प्रवेशद्वारातच तळे साचून कार्यालयात कर्मचारी आणि अभ्यागतांची तारांबळ उडते. यावर्षीही पावसाळा सुरु होण्यापूर्वीच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दुपारी हलका पाऊस झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात तळे साचले. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड उस्मानाबाद दौर्यावर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत असताना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अशी स्थिती होती. पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांच्या सूचनेनुसार आरोग्य व स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांनी कर्मचार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साचलेल्या पाण्याला वाट करुन हटविले. यामुळे प्रशासनाची मंत्र्यासमोर अब्रु वाचली.
कारवाईची गरज दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय गेट समोरील जाळी वाहून गेल्यावर नालीवरील जाळी बांधकामानंतर महिन्यातच कोसळण्याचा प्रकारही घडला होता. त्यावेळी कंत्राटदार व अभियंत्यांवर काहीच कारवाई झाली नव्हती. आता केंद्रीय राज्यमंत्र्यांची बैठक सुरू असतानाच असा प्रकार घडल्यावर तरी अनियोजनबद्ध काम करणाऱ्यांवर आता तरी कारवाई होईल का, हा प्रश्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.